आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक अदालत:शिरूर येथे लोकन्यायालय; 237 प्रकरणे निकाली

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यायालयात शनिवारी (ता.७ मे) लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात २३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर एकूण ३ लाख ७८ हजार ६०० रुपयांची वसुली झाली. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्यात आले, अशी माहिती विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी दिली आहे.

उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरण, बँकेची कर्ज प्रकरणे, चेक बाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर पंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची प्रकरणे आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी ही लोकअदालत घेण्यात आली होती. एकूण २३७ प्रकरणाचा तडजोडी आधारे निपटारा करण्यात आला तर दाखल पूर्व प्रकरणात एसबीआय बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर बँक व गुन्हा कबुली खटले अशी एकूण ३ लाख ७८ हजार ६०० रुपयांची वसुली झाली.

बातम्या आणखी आहेत...