आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिरात परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी चैतन्य महाप्रभू त्या शिक्षांना जीवनात उतरवावे असे प्रतिपादन केले.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज शनिवारी (दि. सात) सावता माळी चौकातील श्री श्री राधा गोविंद मंदिरात स्वागत करण्यात आले. सायंकाळी चार वाजता श्री श्री राधा नीलमाधव यांचा महाभिषेक महाराजांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री श्री राधा नीलमाधव व श्री श्री राधा गोविंद देव यांना अतिशय सुंदर वस्त्रांमध्ये सजवण्यात आले होते.
चैतन्य महाप्रभू यांनी आपल्या जीवनातून भगवान श्रीकृष्णांची कशाप्रकारे भक्ती करावी हे शिकवले चैतन्य महाप्रभू स्वतः श्रीकृष्ण आहेत सुमारे पाचशे वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल प्रदेशातील मायापुर याठिकाणी त्यांचे प्रकट झाले व आपल्या जीवनात संस्कृत मध्ये चैतन्य शिक्षाष्टक लिहिले व दररोज सायंकाळी आपल्या नित्यपार्षदांबरोबर पुरी याठिकाणी त्यावर विशेष चर्चा करत असत पहिले पाच अष्टक साधना भक्ती, दुसरे दोन भावभक्ती व शेवटचे अष्टक हे प्रेमभक्ती प्रदान करते. आपण राधाराणी सारखे प्रेम भगवान श्रीकृष्णांवर करू शकतो .पण राधाराणी इतके नाही, असे महत्त्वाचे प्रतिपादन परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन करतेवेळी केले. रविवार दिनांक आठ रोजी श्रीमद्भागवत कसे परिपूर्ण ग्रंथ असून भगवान श्रीकृष्णांचे नाम रूप गुण लीला व श्रीकृष्ण कथेचे निरूपण त्यांनी यावेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.