आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभु श्रीराम हे आदर्श जीवनाचे प्रतिक आहेत. नितीमत्तेने वागल्यास अंधारावर प्रकाशाची कायम मात होते, हे त्यांच्या चरित्रातून उमजते. प्रभु रामचंद्रांच्या विचारांना अभिप्रेत अशी रामनवमी किर्तीनगर येथील संत नामदेव मंदिरात साजरी झाली असल्याचे मत भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.
परळी येथे कीर्ती नगर परिसरात भाजपा युवानेते श्रीनवास राऊत यांनी संत नामदेव मंदिरात रामनवमी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुंडे या बोलत होत्या. तत्पूर्वी अॅड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचे कीर्तन झाले. पंकजा मुंडे व भक्त मंडळींनी गुलाल आणि फुलांची उधळण करून राम जन्मोत्सव साजरा केला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोविडकाळात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच पंकजा मुंडे यांनी यावेळी धर्म व सदाचाराचा नेहमी विजय होत असतो. त्यामुळे सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, असे आवाहन केले. यावेळी भाजपचे नेते दत्ताप्पा ईटके, वैजनाथ जगतकर, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, केशव माळी, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी, उमेश खाडे, महादेव इटके अरुण पाठक, सुचिता पोखरकर, अश्विन मोगरकर, योगेश पांडकर, नितीन समसेट्टी, गोविंद चौरे, मोहन जोशी, अनिश अग्रवाल, सचिन गित्ते, विजयकुमार खोसे, प्रल्हाद सुरवसे बंटी सातपुते, सुशिल हरंगुळे, राजेश कौलावर, दिलीप नेहरकर, जोगदंड, उमेश निळे, विकास हालगे, मुंजा फुके, बाळू फुले, गोविंद मोहकर, विजय बुंदेले आदी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांचा आयोजक श्रीनिवास राऊत, राजेंद्र ओझा, श्रीपाद शिंदे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी नागरिक हजर होते.
सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांचा सत्कार
भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी परिसरात कोविड काळातील सेवेसाठी अनन्या हाॅस्पीटलचे डॉ. सोमनाथ मुंडे व तेजस्विनी मुंडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच एसबीआय बँकेतील निवृत्त कर्मचारी प्रभाकर घेवारे, उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका शामल साहेबराव गित्ते, सुवर्णा आरसुळे यांचाही सत्कार करण्यात आला. शहराच्या विविध भागातील पुरातन मंदिरात स्वच्छता अभियान राबवणाऱ्या वैद्यनाथ भक्ती मंडळाला लागणारे साहित्य देऊन सदस्यांचा सत्कार पार पडला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.