आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआष्टी तालुक्यातील धसवाडी येथे लम्पीसदृश आजार झाल्याचे पहिले गोवंश आढळून आले हाेते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ लंपी स्किन डिसीज या जनावरांमधील संसर्ग रोगामुळे बीड जिल्ह्यात निर्बंधांबरोबरच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील २८२ गावांमध्ये ११ हजार ५६४ गोवंश जनावरे बाधित झाली. या आजाराची लक्षणे आढळले संबंधीत गावांच्या पाच किलाेमीटर परिसरातील ५ लाख ५ हजार ५०० गोवंशांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे ६ हजार २७० बरे झाले तर ५६४ गोवंश जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जावून गाेवंश यांची पाहणी केली जात आहे. दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गाेवंश यांना सुरक्षीत करण्यासाठी विशेष यंत्रणा बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध केली आहे. त्यामध्ये बीड व लातूर जिल्ह्यासाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त डाॅ. शैलेश केंडे, जिल्ह्यासाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून बी.व्ही. देशमुख, दाेन पशुधन विकास अधिकारी नियुक्त केले हाेते.
जिल्हास्तरीय दृष्टिक्षेपात माहिती
एकूण बाधित गावे: २८२
एकुण बाधित तालुके ११
एकूण बाधित पशु: १४,१२३
एकूण बरे झालेली जनावरे ८३१९
सध्या आजारी असलेले रुग्ण : ५,०७२
(स्त्राेत : जिल्हा पशु संवर्धन कार्यालय, बीड.)
जनावरांच्या आराेग्याची घेतली जाते काळजी लसीकरण ई.पी. सेंटर परिसरात जिल्ह्यातील सर्वच गाेवंश यांच्या आराेग्याची काळजी घेतली जात आहे. शेतकऱ्यांनी देखील काही अडचण दिसून येताच शुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1962 आणि टोल फ्री क्रमांक 18 00 233 0 418 या क्रमांकावर माहिती द्यावी.- विजयकुमार देशमुख, जिल्हा पशुधन अधिकारी, बीड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.