आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात लंपीच्या आजारामुळे गेल्या सव्वा तीन महिन्यात ६२ जनावरे दगावली आहेत. तर २३० जनावरांवर औषधोपचार सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाचे विस्तार अधिकारी बी. एल. गायकवाड यांनी दिली. महिनाभरामध्ये राज्यातील लंपीचा प्रादुर्भाव संपूर्णपणे कमी होण्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी जनावराच्या गोठ्यातील स्वच्छता ठेवून लंपीच्या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्यात सव्वा तीन महिन्यांपासून राज्यभरात लंपीच्या आजाराने मोठ्या प्रमाणात पाय पसरले आहेत. गाय वर्गीय जनावरांना हा लंपीचा आजार होतो. माशांच्या माध्यमातून या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. अंबाजोगाई तालुक्यात लंपीच्या प्रादुर्भावामुळे ६२ जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. ३७ हजार गाय वर्गीय पशुधन तालुक्यात आहे. १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला असला तरी अद्यापही २३० जनावरांना लंपीची लागण झाल्याचे आढळून आले. या जनावरांवर वेळोवेळी औषधोपचार करण्यात येत आहेत. तरीसुद्धा पशु मालकांना लंपीच्या प्रादुर्भावाने हवालदिल केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.