आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:5 तालुक्यांतील 16 गावांत 23 जनावरांना लम्पीसदृश आजार

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी आजार हाेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्य शासनाने संपूर्ण राज्यात जनावरांचा बाजार आणि वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील १६ गावांमधील २३ जनावरांना लम्पीसदृश्य आजार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या गावांच्या परिसरातील पाच कि.मी. अंतरामधील जवळपास ४ हजार १०० जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

जनावरांना सुरक्षीत ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी गाेठा कीटकमुक्त करून नियमित स्वच्छता ठेवावी, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात जनावरांना लम्पी आजार हाेत असल्याची पहिली घटना आष्टी तालुक्यात घडली. त्यानंतर शिरूर कासार, अंबाजाेगाई, केज, बीड या तालुक्यातील १६ गावांमधील २३ जनावरांत लम्पीसदृश्य आजार आढळून आला. जिल्हा प्रशासनाकडून १६ गावांच्या परिसरात लसीकरणाचे काम सुरू आहे. जनावरांचे लसीकरण केले जात आहे. नव्याने मंगळवारपर्यंत ६३ हजार लसी उपलब्ध हाेणार आहेत.

आजार मुक्त जनावरे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी गाेठ्याची नियमित स्वच्छता करावी, दर १५ दिवसांना गाेठा कीटकमुक्त करण्यासाठी आैषध फवारणी करावी. पशुधनाविषयी काेणतीही समस्या आढळून आल्यास १९६२ किंवा १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर फाेन करून माहिती द्यावी, तत्काळ पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध हाेतील, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.पशुधनाच्या बचावासाठी यंत्रणा सज्ज : शेतकऱ्यांनी जनावरे हे कुटुंबातील सदस्य समजून गाेठ्याची नियमित स्वच्छता ठेवावी. काही समस्या आल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...