आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 जणांविरोधात गुन्हा:शेळीपालन व्यवसायातून उत्पन्नाचे आमिष; शेतकरी महिलेला साडेबारा लाखांचा गंडा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेळीपालन व्यवसायासाठी १०० शेळ्या, अडीच एकरावर पत्र्याचे शेड आणि २५ हजार रुपये महिना उत्पन्नाचे आमिष दाखवून शेतकरी महिलेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल साडेबारा लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना परळी शहरात समोर आली.

रत्नप्रभा प्रमोद परळीकर (रा. शंकर पार्वती नगर, परळी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अॅग्राे फूडस कंपनीचे शहरात कार्यालय होते. या कार्यालयाने त्यांना शेळी पालन व्यवसायातून अधिक उत्पन्नाचे सामिष दाखवले. त्यांना १०० शेळ्या, अडीच एकरात पत्र्याचे शेेड आणि २५ हजार रुपये महिना देण्यात येईल असे सांगण्यात आले.

गुंतवणूकीसाठी त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये या प्रमाणे टप्प्याटप्प्याने एकूण साडेबारा लाख रुपये विविध प्रकारची फीस म्हणून घेतले गेले. मात्र, कंपनीने ना त्यांना शेळ्या दिल्या, ना शेड व ना २५ हजार रुपये महिना. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. कंपनीचे एमडी अजितकुमार हिरवे (रा. सातारा), भागवत भगवान तांदळे (रा. चोर पांगरी ता. लोणार जि. बुलढाणा), सुधाकर रत्नाकर मुंडे (रा. गंगाखेड), बापूराव साहेबराव मुळे, सूर्यकांत इंद्रजीत गुट्टे (रा. गंगाखेड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...