आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी:संपकाळात भरती केलेल्या 70 कंत्राटी एसटी चालकांच्या नोकरीवर गदा

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटीच्या संपकाळात चालक म्हणून सेवेत घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम थांबवण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. बीड जिल्ह्यात ७० कामगारांच्या नोकरीवर यामुळे गदा आली आहे. दुसरीकडे एसटी कर्मचारी संघटनेसह राजकीय पुढाऱ्यांनीही या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी केली आहे.

राज्यात नोव्हेेंंबर २०२१ पासून सुमारे सहा महिने एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. कधी नव्हे ते एसटी कर्मचाऱ्यांचा संप दीर्घकाळ चालला होता. सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली गेली, नंतर त्यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मार्च २०२२ मध्ये कंत्राटी स्वरूपात चालकांची भरती केली होती.

अस्तित्व या बाह्यमनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यांच्यामार्फत या चालकांची सेवा घेतली गेली होती. दरम्यान, नंतरच्या काळात एसटीचा संप मिटला आणि सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले तरी हे कंत्राटी कर्मचारी काम करत होते. मात्र, सोमवारी राज्य परिवहन महामंडळाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यात ८ आगारांमधून ७० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली हाेती.

कर्मचाऱ्यांना कायम करा जे सध्या कायम कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात यावे ही आमची मागणी आहे. सोबतच जे कंत्राटी कर्मचारी होते त्यांना काढण्याचा निर्णय चूक असून त्यांनाही सेवेत कायम करावे. - बबन वडमारे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक, मराठवाडा.

आदेश आले आहेत जिल्ह्यात जे संपकाळात कंत्राटी कर्मचारी नेमले होते ते अस्तित्व या कंपनीमार्फत नेमले होते. त्यांची सेवा थांबवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आहेत. सुमारे ५० ते ७० कर्मचारी जिल्ह्यात घेतले होते. काही जणांनी मध्येच काम थांबवले होते.- अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, एसटी

बातम्या आणखी आहेत...