आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुभाष रोड असोसिएशन ची नुकतीच वार्षिक सर्व साधारण सभा अध्यक्ष दिपक कर्नावट , जिवन जोगदंड, सूर्यकांत महाजन व कोषाध्यक्ष मदन काबरा यांच्या उपसथितीत संपन्न झाली. सुभाष रोड असोसिएशन च्या अध्यक्ष पदी गणेश मैड व सचिव पदी सचिन रासने यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली मागील तीन वर्षाचा आढावा घेण्यात आला. मागील तीन वर्षाचा हिशोब कोषाध्यक्ष मदन काबरा यांनी मांडला व सर्वानुमते त्याला संमती देण्यात आली या मिटींगमध्ये दीपक कर्नावट सूर्यकांत महाजन राजेंद्र मनोज जीवन जोगदंड यांनी मार्गदर्शन केले.
तसेच या मीटिंगमध्ये सुभाष रोडच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर पोलिस स्टेशनचे पीआय रवींद्र सानप यांच्या सूचनेवरून माळीवेस ते साठे चौक दरम्यान सीसीटीव्ही लावण्यावर चर्चा होऊन त्यावर सर्व व्यापारी बांधवांनी संमती दर्शविली व लवकरच सुभाष रोड व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने साठे चौक ते माळीवेस दरम्यान सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्ष गणेश मैड व सचिव सचिन रासने उपाध्यक्ष निलेश ललवाणी सुहास मुणोत तसेच सहसचिव संदीप रेवनवार व पवन दहिवाळ वितरण कमिटीचे चेअरमन जीवन जोगदंड दिपक कर्नावट सूर्यकांत महाजन कोषाध्यक्ष मदन काबरा सदस्य म्हणून प्रवीण पटेल सतीश घोडके ओमकार शिंदे किरण सोळंके यांची निवड करण्यात आली व सर्व नूतन कार्यकारणी चा सत्कार करण्यात आला या मिटिंग मध्ये सर्व सुभाष रोडचे व्यापारी उपस्थित होते या बैठकीचे संचलन सूर्यकांत महाजन प्रास्ताविक दीपक कर्नावट व आभार प्रदर्शन जीवन जोगदंड यांनी केले व नूतन अध्यक्ष व सचिव यांनी मनोगत व्यक्त केले व निवडीबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे आभार मानले. सुभाष रोड असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीचे यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच नुतन अध्यक्ष अाणि सचिव यांनी मनाेगत व्यक्त करुन व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करण्याचे वचन यावेळी उपस्थितांना दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.