आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराने सन्मानित‎:महासांगवीच्या महंत राधाताई संत‎ जनाबाई पुरस्काराने सन्मानित‎

पाटाेदा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र संत मीराबाई‎ आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती राधाताई महाराज‎ सानप यांना आळंदी येथील श्री संत मोतीराम महाराज‎ फळा यांच्या वतीने दिला जाणारा संत जनाबाई‎ पुरस्कार श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी प्रदान करण्यात‎ आला. माजी खासदार उल्हासराव पवार, लोकेश‎ चैतन्यजी महाराज, संत तुकाराम महाराज यांचे‎ वंशज नितीन महाराज मोरे तसेच संत नामदेव‎ महाराज यांचे वंशज केशव महाराज नामदास, अमृत‎ महाराज वारिंगे महाराज आळंदीचे माजी नगराध्यक्ष‎ अनिल वडगावकर,विश्वस्त विठ्ठलराव कदम‎ आदींसह मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान‎ करण्यात आला.

राधाताई महाराज यांनी आपल्या‎ किर्तनाच्या माध्यमातुन स्त्रीभृण हत्ये विषयी मोठया‎ प्रमाणात जनजागृती केली आहे. मुलींचा जन्मदर‎ वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी‎ केवळ जनजागृतीचेच काम केले नाही तर‎ स्वतःच्याच कृतीतुन त्यांनी अध्यात्मातील संत ही‎ कशा प्रकारे खरे समाजकार्य करू शकतात याचे‎ आदर्श उदाहरण त्यांनी ठेवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...