आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजची पॉझिटिव्ह बातमी:​​​​​​​बीडमध्ये 4 मित्रांनी सरकारी मदतीशिवाय बनवले 50 खाटांचे कोविड सेंटर, नो प्रॉफिट-नो लॉसच्या संकल्पनेवर सुरू आहे हे रुग्णालय

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या हॉस्पिटलमध्ये 37 अॅक्टिव्ह पेशंट

राज्यातील कोरोना संक्रमणाचा धोका गंभीर होत असतानाच अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, बेड आणि औषधांच्या कमतरतेविषयी माहिती समोर येत आहे. लोक यासाठी भटकत असल्याचे दिसत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील चार मित्रांनी प्रशासनाच्या मदतीची प्रतिक्षा न करता एकजुट होऊन आपल्या परिसरातील लोकांसाठी एक कोविड सेंटर तयार केले आहे. 50 बेडचे हे कोविड सेंटर बनवण्यासाठी जवळपास 30 लाख रुपयांचा खर्च आला, या चार मित्रांनी यामध्ये बरोबरीने खर्च केला आहे.

शाळेत बनलेल्या या कोविड सेंटरला प्रकाश देसारडा, डॉ. भगवान सानप, डॉ. गणेश देशपांडे आणि अभिजीत डुंगरवाल यांनी 'नो प्रॉफिट-नो लॉस' संकल्पनेवर तयार केले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांकडून सरकारी हॉस्पिटलच्या फीसपेक्षाही कमी पैसे घेतले जातात. अभिजीत डुंगरवाल सांगतात की, रुग्णांकडून पैसे घेण्याचा एकच उद्देश आहे की, येथे येणारा रुग्ण सन्मानाने उपचार घेऊन घरी जाऊ शकेल. कोणी तरी दया भाव दाखवत त्यांच्यावर उपचार केले आहे असे त्यांच्या मनात अजिबात येऊ नये यासाठी ही थोडी फीस घेतली जात आहे.

या चार मित्रांनी मिळून हे कोविड सेंटर सुरू केले आहे.
या चार मित्रांनी मिळून हे कोविड सेंटर सुरू केले आहे.

रुग्णांना दिले जाते तीन वेळचे भोजन
बीड जिल्ह्याच्या शिरूर तहसीलमध्ये 'आयडियल इंग्लिश स्कूल'मध्ये उभारण्यात आलेले कोविड-19 शिरुर तहसीलच्या लोकांसाठी लाइफ लाइन बनले आहे. या कोविड सेंटरमध्ये 12 ऑक्सिजन बेड आहेत आणि 38 जनल बेडची व्यवस्था आहे. येथे राहणाऱ्या रुग्णांना तीन वेळचे जेवण याच कोविड सेंटरकडून दिले जाते. डुंगरवाल म्हणतात की - महामारी संपूर्ण देशा पसरली आहे. अशा वेळी आमचे कर्तव्य आहे की, आम्ही सरकारच्या मदतीसाठी पुढे यावे. यासाठी आम्ही आपल्या पैशांनी हे कोविड सेंटर सुरू केले आहे.

सध्या हॉस्पिटलमध्ये 37 अॅक्टिव्ह पेशंट
प्रकाश यांनी सांगितले की, आमच्याजवळ 10 डॉक्टर मिळून 40 लोकांचा स्टाफ आहे. 18 एप्रिलपासून आतापर्यंत आम्ही 150 लोकांना बरे करुन घरी पाठवले आहे. सध्या 37 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासाठी पुरेसे ऑक्सिजन आणि औषधांचा स्टॉक येथे उपलब्ध आहे.

कोविड सेंटरमध्ये काय आहे विशेष?

  • या कोविड सेंटरमध्ये 10 स्पेशलिस्ट डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ मोठ्या प्रमाणात आहेत.
  • येथे ECG, एक्स-रे, 3 अँम्बुलंस आणि ऑक्सिजनसाठी 15-20 सिलेंटर नेहमीच उपलब्ध असतात.
  • येथे सर्व रुग्णांना फ्रीमध्ये होम क्वारंटाइनसाठी योग्य समुपदेशन दिले जात आहे.
  • कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
  • सर्व रुग्णांची तीन वेळच्या जेवणाची व्यवस्थाही कोविड सेंटरकडूनच केली जात आहे.
  • संक्रमित रुग्णांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही या कोविड सेंटरकडूनच घेतली जात आहे. दरम्यान दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत या कोविड सेंटरवर एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

अशी सुचली कोविड सेंटर बनवण्याची कल्पना
प्रकाश देसरडा यांनी सांगितले की, एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यात ते आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी पुण्यात गेले होते. येथे त्यांनी पाहिले की, अनेक रुग्ण योग्य वेळी बेड मिळू न शकल्याने जीव गमावत आहेत. त्यांचे जवळचे लोक आणि गावातील लोकांसोबत असे होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या शाळेला कोविड सेंटर बनवण्याचा निर्णय घेतला. प्रकाश यांनी सांगितले की, त्यांनी ही कल्पना आपल्या चार मित्रांसोबत शेअर केली आणि त्यांच्या सहयोगाने 18 एप्रिलला हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. प्रकाश यांनी सांगितले की, सध्या येथे 50 रुग्णांची काळजी घेतली जात आहे. मात्र गरज पडली तर येणाऱ्या काळात अजून जास्त रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था येथे केली जाऊ शकते.

अभिजीत डुंगरवाल यांनी सांगितले, 'हे सेंटर शिरुर कासरच्या लोकांसाठी बनवण्यात आले आहे. आम्हाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. याच्या निर्मितीमध्ये 30 लाख रुपयांचा खर्च आला आहे. आमची इच्छा आहे की, लवकरच ही महामारी संपावी आणि सर्व रुग्णांनी बरे होऊन आपल्या घरी जावे.'
इनपुट - रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...