आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:कोरोनात ज्येष्ठांबाबत महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे! नॅशनल क्राइम ब्युरो ऑफ रेकॉर्डचा अहवाल, 2020 मध्ये 5 हजार गुन्हे नोंद

बीड (अमोल मुळे)18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात पुण्यात सर्वाधिक गुन्हे

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती देशात चिंताजनक आहे. सन २०२० मध्ये ज्येष्ठांच्या बाबतीत देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले गेेले आहेत. नॅशनल क्राइम ब्युरो ऑफ रेकॉर्डने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्यासंबंधीच्या गुन्ह्यांसाठी विशेष कायदा करण्यात आला आहे तरीही राज्यात ज्येष्ठांच्या बाबतीत होत असलेले हिंसाचार, फसवणूक अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. देशातील गुन्ह्यांची नोंद ठेवणाऱ्या नॅशनल क्राइम ब्युरो ऑफ रेकाॅर्डने सप्टेंबर महिन्यात आपला सन २०२० सालचा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये राज्यात ज्येष्ठांच्या बाबतीत सर्वाधिक ४ हजार ९०९ गुन्हे नोंद झाल्याचे समोर आले आहे. सन २०२० मध्ये नोंद झालेल्या एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत ज्येष्ठांच्या गुन्ह्यांची संख्या ४४ टक्के इतकी आहे हे विशेष.

सन २०१८ व सन २०१९ या दोन वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंद झाले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही ज्येष्ठांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत महाराष्ट्र तळाला असल्याचे अधोरेखित झाले आहे.

राज्यात पुण्यात सर्वाधिक गुन्हे : पुणे शहरात ज्येष्ठांबाबतचे सर्वाधिक गुन्हे नोंद झाले.२०२० मध्ये १२३ गुन्हे पुणे शहरात नोंद झाले आहेत. तरी गत दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा कमी असून सन २०१८ मध्ये १६९ तर सन २०१९ मध्ये २२४ गुन्हे नोंद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...