आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी:नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणत परळीत येण्याचे शिवसैनिकांनी दिले आव्हान

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या वतीने परळीत नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन करत घोषणाबाजी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन परळी शिवसेनेने नारायण राणे यांना कोंबडीचोर म्हणत परळीत येवुन दाखवा आम्ही शिवसैनिकांचा हिसका दाखवु असे आव्हान शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी दिले. शिवसेनेच्या वतीने परळीत नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन करत घोषणाबाजी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिक येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर परळी येथे शिवसेनेच्या वतिने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करुन कोंबड्या सोडण्यात आल्या.यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात कोंबडीचोर च्या घोषणा दिल्या.नारायण राणे यांनी परळीत येवुन दाखवावे आम्ही शिवसैनिक त्यांना शिवसेना स्टाईलने हिसका दाखवु,त्यांना परळीत पाय ठेवू देणार नाही आव्हान माजी उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी दिले.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,शहरप्रमुख राजेश विभुते,भोजराज पालिवाल,नारायण सातपुते,सतिश जगताप,संजय कुकडे,सचिन स्वामी,वैजनाथ माने,दिपक शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...