आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाध्यक्षपद:महाराष्ट्र नवनिर्माण सहकार‎ सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुरवसे‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्याचे‎ कार्य करणाऱ्या अशोक सुरवसे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या‎ बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण‎ सहकार सेनेचे अध्यक्ष मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी ही निवड केली आहे.‎

यावेळी शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक‎ तावरे, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष रवी नेमाने, मनसे बीड जिल्हाध्यक्ष‎ श्रीराम बादाडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे,‎ शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रामेश्वर‎ साळुंखे, बीड तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, शिरूर तालुकाध्यक्ष सोपान मोरे,‎ बीड शहराध्यक्ष करण लोंढे, शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर, शहर‎ सचिव तुषार दोडके आदी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...