आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ; स्वाराती ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयात वृक्षारोपण

अंबाजोगाई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन व राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले आहे. स्वाराती महाविद्यालयात नविन ग्रंथालय विभाग व पदवीपूर्व मुलांचे वसतीगृह येथील परिसरात शुक्रवारी (ता.१०) हे वृक्षारोपण शिबिर पार पडले. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आले.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई संस्थेचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी डॉ.शं.स. घाटे, डॉ.रा.रा.जाधव, डॉ.प्र.मु.हिप्परगेकर, डॉ. बिराजदार, डॉ.सु.मा.हंडरगुळे, डॉ.शि.दा. विरारे, डॉ.अ.ना.नगाटे, डॉ.वि. लि.वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश अब्दागिरे व सहकाऱ्यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला. पदवीपूर्व मुलांचे वसतीगृह येथील परिसरामध्ये एकुण ५० झाडे लावण्यात आली. डॉ. दि. रा. लामतुरे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...