आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून राम सातपुते मित्रमंडळ पाटोदा यांच्या वतीने अन्नदानाचा महायज्ञ पार पडत आहे. रविवारी (१२ मार्च) सेवाश्रम (ता.शिरूर), इन्फंट इंडिया आनंदग्राम (ता.बीड), आपले आजोळ वृध्दाश्रम (बीड), माणुसकीची भिंत पाटोदा याठिकाणी अन्नदान करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून मित्रमंडळाच्या वतीने हे उपक्रम राबवले जात आहेत. पाटोदा येथील आमदार राम सातपुते मित्रमंडळाच्या वतीने मंगेश रंधवे हे गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
अन्नदान, शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गरजूंना औषधांचे वितरण असे विविध उपक्रम मित्रमंडळाच्या वतीने राबवण्यात आले. कोविडकाळात गरजूंना आर्सेनिक अल्बमचे वाटप, मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यासह रेमडेसिविर उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार राम सातपुते मित्रमंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला होता. यंदाही रविवारी शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथील तमासगीर कलावंतांच्या तसेच ऊसतोड कामगार पाल्यांचे एक दिवसाचे पालकत्व स्विकारण्यात आले. याबरोबरच इन्फंट इंडिया आनंदवन येथील चिमुकल्यांसाठीही अन्नदानाची सेवा देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी आमदार राम सातपुते मित्रमंडळाचा सामाजिक कार्याचा उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
तसेच येथील चिमुकल्यांनीही आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधला. आपले आजोळ वृध्दाश्रम याठिकाणीही एक दिवसाचे पालकत्त्व घेण्यात आले. याबरोबरच पाटोदा येथील बसस्थानक परिसरात माणुसकीची भिंत हा उपक्रम कार्यरत आहे. या माध्यमातून बसस्थानक व परिसरातील गरजूंच्या भोजनाची सोय केली जाते. याठिकाणी पाच दिवसांचे पालकत्त्व आमदार राम सातपुते मित्रमंडळाच्या वतीने स्विकारण्यात आले. यावेळी मंगेश रंधवे व इतर हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.