आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा मृत्यू:माहेरच्या मंडळींनी केला घातपाताचा आरोप‎ ; मृतदेह‎ आणला एसपी कार्यालयात‎

बीड‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव येथे एका विवाहितेचा‎ मृत्यू झाल्यानंतर माहेरच्या मंडळींनी‎ घातपाताचा आरोप करुन सासरच्या‎ मंडळींवर खुनाचा गुन्हा नोंद‎ करण्याच्या मागणीसाठी मृतदेह थेट‎ एस पी कार्यालयात आणला. यामुळे‎ काही काळ तणाव निर्माण झाला‎ होता.‎ माजलगाव शहरातील फुले नगर‎ भागातील विवाहिता शेख बानो शेख‎ रफिक (३५) या महिलेचा‎ मंगळवारी मृत्यू झाला. सासरच्या‎ मंडळींनी हृदयविकारच्या झटक्याने‎ हा मृत्यू झाल्याचे सांगितले मात्र‎ विवाहितेच्या कानातून, डोळ्यातून‎ व नाकातून रक्तस्त्राव होत होता.‎ त्यामुळे माहेरच्या मंडळींनी‎ घातपाताचा संशय व्यक्त केला.‎ सासरच्या मंडळींवर खूनाचा गुन्हा‎ नोंद करण्याची मागणी केली. मात्र,‎ माजलगाव शहर पोलिसांनी गुन्हा‎ नोंद न केल्याने मृतदेह घेऊन थेट‎ पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले.‎ एसपींनी या प्रकरणी गुन्हा नोंद‎ करण्याचे आदेश दिले होते मात्र‎ बुधवारी दुपार पर्यंत गुन्हा नोंद‎ नव्हता. नातेवाईकांनी विवाहितेचा‎ मृतदेह एसपी कार्यालयात‎ आणल्याने तणाव निर्माण झाला‎ होता.‎

बातम्या आणखी आहेत...