आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूल्याधिष्ठित संस्कारामुळे समाजाची व राष्ट्राची प्रगती होते. माहेश्वरी समाजाने कायम सचोटी, संस्कार व समर्पण भावनेतून कार्य केलेले आहे. सेवा, त्याग व सदाचार ही त्रिसुत्री समाजाच्या यशामागे असून यापुढेही तिचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा.गोपाल बाहेती यांनी केले. महेश नवमीनिमित्त अंबाजोगाई येथे माहेश्वरी समाजाच्यावतीने महेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बाहेती हे बोलत होते. स्व.विलासराव देशमुख सभागृहात झालेल्या मुख्य समारंभाची सुरुवात राष्ट्रीय पुरस्कार विजेता ऋषिकेश मुंदडा याच्या स्वागत नृत्याने झाली.
या कार्यक्रमात भगवान महेश यांच्या मूर्तीचे पूजन व महेश वंदना प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून गिरधारीलाल भराडिया, श्रीकांत बजाज, बालमुकुंद बांगड, देवकन्या धूत, पार्वतीबाई जाजू यांच्यासह अॅॕड.संजय लोहिया, संतोष भंडारी, योगिता भराडीया, पद्मा सारडा, पवन भराडीया, राधेश्याम लोहिया, अॅड.ललीत तोष्णीवाल हे हजर होते. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीनिवास मुंदडा, राजाभाऊ लोहिया (भारज), अंजली चरखा, सर्वेश बजाज, राजपाल सारडा व ऋषिकेश मुंदडा यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश जाजू यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय लक्ष्मीनारायण सोमानी यांनी करून दिला. आभार सुशील रांदड सूत्रसंचालन विशाखा बजाज व दीपा करवा यांनी केले.
शोभायात्रेने वेधले शहरवासियांचे लक्ष
महेश नवमीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले. यासह शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयातून भगवान महेश यांच्या प्रतिमेच्या भव्य शोभायात्राचेही आयोजन करण्यात आले होते. यात समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सांस्कृतिक वेशभूषेसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा राजस्थानी मंगल कार्यालय येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ, मंडी बाजार, पाटील चौक, बसस्थानक मार्गे जाऊन नगरपालिकेसमोर समारोप शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.