आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब कुटुंब:अर्धवट हृदयाच्या महेशला अखेर मिळाले जीवनदान ; गावकऱ्यांनी केले स्वागत

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तलवाडा (ता.गेवराई) येथील अत्यंत गरीब कुटुंबातील महेश दगडू मोरे याला जन्मताच हृदयविकाराने ग्रासले होते. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च कुटुंबाला पेलणारा नव्हता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या पुढाकाराने हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. महेश हा अर्धा एकर जमीन असणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा.

त्याचा मोठा भाऊ गजानन मोरे व तो जन्मतःच हृदयाच्या विकाराने त्रस्त आहेत. हृदयविकाराने भावंडे आजारी पडतात. त्यांचे खेळणे, हसणे आजाराने हिरावले होते. गरीब परिस्थितीने महेशवर उपचार करणे कुटुंबाला शक्य नव्हते. पूजा मोरे यांनी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी बोलून तत्काळ रुग्णाला मुंबईला नेले. डॉक्टरांनी शास्त्रक्रियेस जोखीम सांगितली, परंतु मोरे यांनी आईवडिलांना विश्वासात घेऊन आधार दिला व डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने अत्यंत मोठी शस्त्रक्रिया ही मोफत पार पडली. शनिवारी महेश घरी परतला असून त्याचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...