आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:माजलगाव धरणाची वाटचाल शंभरीकडे, िसंदफणा, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन वर्षांपासून माजलगाव धरण शंभर टक्के भरत असून यंदाही हे धरण भरण्याची शक्यता आहे. बुधवारी हे धरण नव्वद टक्क्यांवर गेले असून या धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सिंदफणा नदी व गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. धरण नव्वद टक्क्यांवर गेल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणून माजलगाव येथील धरणाची ओळख आहे. मागील तीन वर्षांपासून हे धरण सतत भरत आहे. धरण कार्यक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आणि नाथसागरातून कॅनॉलद्वारे होत असलेली पाण्याची आवक या कारणामुळे बुधवारी सकाळी माजलगाव धरण ९८.९७ टक्के भरले आहे. मागील चार वर्षांपासुन हे धरण सतत भरत असल्याने तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तर बुधवारी या धरणात ९८ टक्के पाणीसाठा आल्याने बीड शहर, माजलगाव शहर व पुनर्वसित अकरा खेडी व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...