आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणाबाजी करत शासनाचा धिक्कार:माजलगाव ; ढोल बजावो आंदोलन

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांचा २०१३-१४ आणि २०१४-१५ च्या ठिबक सिंचनाचे अनुदान अद्याप सात वर्ष उलटले तरी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने २ ऑक्टोबर रोजी कृषी अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

जिल्हा कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनचे अनुदान आठ दिवसात न दिल्यास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा पाटील यांनी दिला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाचा धिक्कार केला.

बातम्या आणखी आहेत...