आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:माजलगाव न. प. समोर ठिय्या आंदाेलन‎

माजलगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आझाद नगर येथील नाल्या तुंबल्यामुळे‎ सांडपाणी साचून परिसरासह मुख्य रस्त्यावर दुर्गंधी‎ पसरली आहे. तत्काळ नाले सफाई करण्यात यावी. या‎ मागणीसाठी शेकडो नागरिकांनी गुरुवारी नगर परिषद‎ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.‎ शहरातील आझाद नगर येथून सांडपाणी वाहून‎ नेणारा मोठा नाला गेला आहे. मात्र या नाल्याची‎ मागील अनेक महिन्यापासून नाल्यातील घाण स्वच्छ्ता‎ करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा नाला तुंबला गेला‎ असून सांडपाणी या भागातील नागरिकाच्या घरात,‎ रस्त्यावर साचले आहे.

या मुख्य रस्त्यालगतच्या विद्युत‎ पुरवठा करणारी रोहित्र असल्याने मोठा धोका होऊ‎ शकतो. त्यामुळे संतप्त होऊन गुरुवारी सकाळी ११.३०‎ वाजता आझाद नगरच्या शेकडो नागरिकांनी नगर‎ परिषद कार्यालयात ठिय्या मांडून पालिकेच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ निष्क्रियतेचा निषेध केला. यावेळी प्रशासक अविनाश‎ निळेकर यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन‎ स्विकारले. तात्काळ नाले सफाई करण्याचे आश्वासन‎ दिले. यावेळी ॲड.सय्यद याकूब, सलीम बापू सय्यद,‎ राम गायकवाड, अशोक लांडगे, समशेर पठाण, शेख‎ आसेफ, फारुख सय्यद, महेबुब सय्यद आदींसह‎ नागरिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...