आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना:बलात्कारातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील पोलिस कर्मचाऱ्यांसह कारागृहातील कैद्यांना केले क्वारंटाईन

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी; कारागृहात येताच कोरोनाचे निदान

बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेला व पाच दिवसांची पोलीस कोठडी संपवून न्यायालयीन कोठडी झालेला माजलगाव येथील एक तरुण कोरोना बाधित आढळला आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेले पोलीस कर्मचारी व कारागृहातील कैदी यासह इतर व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कारागृह अधीक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

माजलगाव तालुक्यातील जदीद जवळा येथील एक तरुण एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवून 16 जून रोजी पुण्याला पळवून गेला होता. या प्रकरणी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा मुलींच्या नातेवाईकांनी नोंदवला होता. दरम्यान, 8 जुलै रोजी हे पळून गेलेले जोडपे पोलिसांनी शोधले. यानंतर पीडित मुलीने तरुणाविरोधात माजलगाव ग्रामीण ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली होती.

न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याचा 13 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपताच त्याला 13 जुलै रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा कारागृह प्रशासनाकडे हस्तांतरित केले गेले होते.

तात्पुरत्या कारागृहात ठेवले; 13 आरोपींचा संपर्क
दरम्यान, या तरुणाला कारागृह प्रशासाने तयार केलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवले होते. कारागृहात प्रवेश देताना प्रत्येक कैद्याची कोरोना चाचणी केली जाते यामुळे १३ रोजीच रात्री त्याचा स्वॅब तपासणीसाठी दिला गेला होता. बुधवारी पहाटे त्याचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.त्यामुळे खळबळ उडाली त्याचा सुमारे १३ इतर कैद्यांशी  संपर्क आला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगितले जात आहे परंतु, कारागृहातील कर्मचारी व इतर कैद्यांचा एकमेकांशी जेवण, एकच बाथरूम, टाॅयलेट यामुळे आलेला संपर्क पाहता ही संख्या मोठी असू शकते 

माजलगाव पोलिसांचाही संपर्क; तरूणीही क्वारंटाईन
या तरूणाचा माजलगाव पोलिसांशीही संपर्कातील आला आहे. त्याला अटक करणारे पोलिस, न्यायालयात घेऊन जाणारे पोलिस यांनाही आता क्वारंटाईन केले जात आहे.आरोग्य विभाग त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत आहे.तक्रारदार तरुणीलाही क्वारंटाईन केले गेले आहे. तिचीही कोरोना तपासणी केली जाणार आहे.