आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजरंग:माजलगाव सेवा सहकारी सोसायटी निवडणूक ‘गुपचूप’उरकण्याचा ;

बी़ड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव सेवा सहकारी सोसायटी ही तालुक्यातील एक प्रतिष्ठेची आणि सर्वात मोठी सोसायटी आहे. गेल्या निवडणुकीत एकीकडे आमदार प्रकाश सोळंके यांचा गट तर दुसरीकडे येथीलच दिग्गज मंडळींनी एकत्र केलेला गट अशी अटीतटीची लढत झाली होती.

त्यात आमदार सोळंकेंच्या गटाला मात खावी लागली होती. परंतु, यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी होहे. पूर्वी विरोधात असलेले राजकारणी आता एका गादीवर असल्याने निवडणूक गुपचूप गुपचूप गुंडाळली जात आहे. राजकीय सेटलमेंटमध्ये सोसायटी कुणाला आंदण तरी दिली जात नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. माजलगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. ८ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होहे. अर्ज भरण्यासाठीचे तीन दिवस उरकूनही गेलेले आहेत. परंतु, बऱ्याच सभासदांना सोसायटीची निवडणूक लागल्याचीच माहिती अजूनही झालेली नाही. अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवसांचा कालावधी उरलेला आहे. या दोन दिवसांत कमीत कमी अर्ज येऊन निवडणूक बिनविरोध काढण्यासाठीच्या मोठ्या हालचाली सुरू होत्या. परंतु, काही सुज्ञ सभासदांनी माध्यमांना माहिती कळवल्यानंतर निवडणूक लागल्याचे समोर आले. वास्तविक पाहता निवडणूक कार्यक्रमाची जाहिरात देऊन संबंधित वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचू नये, याचीही तजवीज केल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजप झोपेतच, तर राष्ट्रवादीचा सेटलमेंट मोड
राजकीय गोटात निवडणूक म्हटलं की, प्रतिस्पर्धी गट हा लक्ष ठेवूनच असतो व शह काटशह असे प्रकार चालतात. मात्र, येथील भाजप नेते स्थानिक स्वराज्य संस्था व सोसायट्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतानाही दुर्लक्ष करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजून एकाही उमेदवाराचा अर्ज न आल्यामुळे राष्ट्रवादीचा येथे सेटलमेंट मोड आहे की काय अशी चर्चा रंगतेय.

बातम्या आणखी आहेत...