आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील ओपन स्पेस आणि त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत आ. प्रकाश सोळंके यांनी ३१ डिसेंबरला उपोषणाची नोटीस दिली होती त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर उपोषण मागे घेतले गेल. यावर नगरपरिषदेने कार्यवाही सुरू केली असून बुधवारी शहरातील ओपन स्पेस आणि त्यावरील अतिक्रमणे याबाबत सर्व्हेला सुरुवात झाली.
एकाच दिवसात दहा ठिकाणच्या ओपन स्पेस वरचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. माजलगाव शहरात जवळपास १३ एकर एवढे ओपन स्पेस आहेत. पालिकेच्या विविध प्रयोजनांसाठी हे ओपन स्पेस उपयोगी पडतात परंतु काही जुन्या अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांना हाताशी धरुन पालिकेतील या बाबतचे अनेक रेकॉर्ड गायब केली असल्याने शहरातील ओपन स्पेस वर अनेकांचा डोळा होता व आहे त्याविरुद्ध नगर परिषदने आता नवीन सर्व्हे करून उपलब्ध रेकॉर्ड नुसार पाहणी करण्याचे ठरवले असून यात पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार आहे.
पथकात इंजिनिअर आशिष तुसे यांच्यासोबत अनंत वाघमारे, सय्यद अरेफ, आकाश गालफाडे, विशाल शिंदे, विलेश कांबळे, राजेभाऊ मिसाळ, संकेत साळवे, सागर उजगरे, संजय ससाणे, गणेश जवळ, शेख आरेफ, शेख बाबर, विलास शिंदे आदींचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.