आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहाद:महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरात लवकर करा

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह जिहादची वाढत चालेलेली गंभीरता पहाता अनेक राज्यांत झालेल्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडे यांनी बीड येथील हिंदु राष्ट्र- जागृती सभेतून केली आहे.

शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी राष्ट्रीय व्याख्यानकार, प्रवचनकार योगेश महाराज साळेगांवकर, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडे उपस्थित होते. या जागृती सभेच्या सुरूवातीला विवेक झरकर यांनी शंखनाद केल्यांनतर योगेश महाराज साळेगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अ.भा. ब्राह्मण महासंघाचे वेदशास्त्र संपन्न अनिल महाराज निर्मळ, वेदशास्त्र संपन्न कैलास महाराज रामदासी यांनी वेदमंत्र पठण केले.

या वेळी सभेच्या व्यासपीठावरून बोलतांना प्रमुख वक्ते मनोज खाडे म्हणाले की, बीड येथील कंकालेश्वर मंदिराची जमीन नियमबाह्य पद्धतीने विक्री झाली असून त्या भूमीवर काही लोकांचा ताबा असून अनधिकृतपणे बांधकाम झालेले आहे. काही कागदपत्रही प्राप्त झालेली असून यासाठीही जागृती करणे आवश्यक आहे. या सभेच्या ठिकाणी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता.

कार्याचा आढावा समितीचे बीड जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी मांडला. आभार विपुल भोपळे व अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी मानले मान्यवरांच्या हस्ते सनातन प्रकाशित ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.सभेसाठी हजारो नागरिकांसह विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

देशभक्ती असावी
मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात येत असून यातून हिंदू युवतींची हत्या करण्यात येत आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रात कठोर कायदा करावा. सावरकरांची देशभक्ती कळण्यासाठी रक्तातच देशभक्ती आवश्यक आहे.-योगेश महाराज साळेगावकर, राष्ट्रीय कीर्तनकार

बातम्या आणखी आहेत...