आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणे:महाबीज कंपनीच्या सोयाबीनच्या विविध वाणांचे बियाणे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्या : आ. मुंदडा

अंबाजोगाई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाबीज कंपनीच्या सोयाबीनच्या विवीध वाणांची बियाणे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहे व नगदी पीक म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनचे पीक घेतो व त्यातही महाबीज कंपनीच्या सोयाबीनच्या विवीध वाणांच्या बियाणांची बाजारा मध्ये खुप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे.

परंतु महाबीज कंपनीच्या बियाणाची बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहण करावा लागत आहे. त्यामुळे महाबीज कंपनीच्या सोयाबीनच्या विवीध वाणांची बियाणे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तरी बीड जिल्ह्यात महाबीज कंपनीच्या सोयाबीनच्या विवीध वाणांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...