आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:निवडणूक कामात कसूर; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत वडवणी तालुक्यातील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचार्‍यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, , दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...