आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेत गैरप्रकार:टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार, गुन्हा‎ नोंदवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न‎

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगणक टंकलेखन परिक्षेत झालेल्या गैर‎ प्रकारात शिक्षण विभागाने केवळ एका खासगी संस्था‎ चालकावर गुन्हा नोंदवला खरा मात्र या परिक्षेत उघड‎ आर्थिक व्यवहार होत असताना आणि डमी परीक्षार्थी‎ बसवले जात असताना दोषी अधिकारी मात्र मोकाट‎ आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात‎ आलेली नाही. संगणक टंकलेखन परिक्षेत डमी‎ परीक्षार्थी बसवले जात असल्याचा प्रकार बीडमध्ये‎ समोर आला होता. या प्रकरणी चौकशीनंतर‎ वडवणीच्या एका खासगी केंद्र चालक असलेल्या‎ शिवदास तोंडे या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला. विना‎ परवानगी त्याने परिक्षा कक्षात प्रवेश केला.‎

बातम्या आणखी आहेत...