आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रकल्प:खोडस येथे मनस्विनी महिला प्रकल्प राबवणार‎

धारूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील खोडस गावात‎ अंबाजोगाई येथील मानवलोक‎ मनस्विनी महिला प्रकल्पाच्या‎ अंतर्गत लिंगभाव समानता प्रकल्प‎ राबवणार असल्याची माहिती‎ मनस्विनी महिला प्रकल्प समन्वयक‎ डॉ.अरुंधती पाटील यांनी दिली.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ सरपंच रामदास लाखे होते तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून मनस्विनी‎ महिला प्रकल्पाच्या समन्वयिका‎ डॉ.अरुंधती पाटील होत्या.

यावेळी‎ पाटील यांनी लिंगभाव समानता या‎ प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू‎ असलेल्या कामाची माहिती दिली.‎ अंबाजोगाई तालुक्यातील २० आणि‎ धारूर तालुक्यातील १० गावांमध्ये‎ मनस्विनी महिला प्रकल्पाचे कार्य‎ गेल्या ३ वर्षापासून सुरू आहे.‎ धारूर विभागातील जुन्या‎ प्रकल्पातील गावे बदलून नवीन‎ काही गावे घेण्यात आली आहेत.‎ त्यातीलच खोडस हे एक नवीन गाव‎ आहे.या गावाची ओळख बैठक पार‎ पडली.

गावांमध्ये काय काम होणार‎ आहे? मनस्विनी महिला प्रकल्प‎ काय काम करतो? तसेच‎ महिलांच्या संदर्भात असणारी कायदे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याविषयी सविस्तर मार्गदर्शन‎ करण्यात आले. अध्यक्षीय‎ समारोपात गावचे सरपंच रामदास‎ लाखे यांनी सर्व मदत करण्याची‎ ग्वाही दिली. गावातील महिलांनी‎ जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आवाहन करण्यात आले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वखरे‎ यांनी केले. यावेळी मनस्विनी‎ महिला प्रकल्पाचे कार्यकर्ते खाडे‎ यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या‎ संख्येने उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...