आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्ह्यात ‘मंडणगड पॅटर्न’ राबविण्यास सुरुवात करण्यात आली. पॅटर्नची फलश्रुती झाली असून, मोहिमेच्या कालावधीत १३४६ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अधिकारी, कर्मचारी व समतादुत यांनी जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. या विशेष मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिपुर्ण प्रस्ताव दाखल करणे सोयीचे झाले. परिणामी, जिल्हा जात पडताळणी समितीने तातडीने प्रस्ताव निकाली काढून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केले.
विज्ञान शाखेत प्रवेशित ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्याची इत्यंभूत माहिती नसते प्रमाणपत्र न मिळाल्यास विविध अभ्यासक्रमास त्यांना प्रवेश मिळू शकत नाही, शैक्षणिक कामाकरिता जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सदर प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी समाज कल्याण आयुक्त व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, यांनी राज्यात “मंडणगड पॅटर्न’ राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात गत महिन्यापासून विशेष मोहीम राबवून करण्यात आली. जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संगीता मकरंद, प्रदीप भोगले यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले. यासाठी जात पडताळणी समितीचे सर्व कर्मचारी,बार्टी समतादूत आदींनी परिश्रम घेतले.
तत्परतेने काम
जिल्ह्यात मंडणगड पॅटर्न राबवण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाील सर्वच कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम केले. अध्यक्ष दिलीप जगदाळे, प्रदीप भोगले यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही मोहिम यशस्वीपणे राबवली गेली.- संगिता मकरंद, उपायुक्त, जात पडताळणी समिती, बीड
गैरसोय टळणार
१ नोव्हंेबर ते १५ डिसेंबर दरम्यान विशेष मोहिमेत १३४६ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असल्याने आता या विद्यार्थ्यांना पुढे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळांमधून ही बाब सातत्याने मांडण्यात जात पडताळणी समितीला यश आले होते त्यामुळे संख्या वाढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.