आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफळांचा राजा आंबा. आंब्याचा हंगाम म्हणजे एक पर्वणीच असते. आधुनिक काळात तर आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यानुसार त्याचा भाव ठरत असल्याने खवय्यांना निवडीची बरीच संधी असते. पण एखादा आंबा जर चक्क अडीच लाख रुपये किलो असेल तर?... होय, असा अत्यंत महागडा परंतु चवीला रसाळ, गोड तैयो नो तामांगो हा जपानी अंबा आता बीड जिल्ह्याच्या मातीत पिकणार आहे.
सूर्याचे अंडे म्हणून ओळख असलेल्या या जपानी आंब्याची लागवड वडवणी तालुक्यातील पुसरा येथे माजलगावचे प्रगतिशील शेतकरी धैर्यशील सोळंके यांनी केली आहे. सीताफळ उत्पादनात मराठवाड्यात नावाजलेले बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील प्रगतिशील शेतकरी धैर्यशील सोळंके यांनी वडवणी तालुक्यातील पुसरा येथील त्यांच्या शेतात तैयो नो तामांगो या जपानी अंब्याच्या २० रोपांची जुलै २०२१ मध्ये लागवड केली. या आंब्याची विशेष जात मूळ जपानमध्ये आढळते. कोलकाता येथून त्यांनी दोन हजार रुपयाला एक रोप या प्रमाणे रोपांची खरेदी करून पुसरा येथील शेतात लागवड केली आहे.
सूर्याचे अंडे म्हणून ओळख
जपानमधील मियाजारी प्रांतात हा अंबा पूर्वी पिकत असे. नंतर तो मध्य प्रदेशातील जबलपूर येथेही पिकू लागला. जपानमध्ये हरितगृहात हा आंबा वाढवला जातो. रंग लाल असल्यामुळे या आंब्याला जपानमध्ये सूर्याचे अंडे म्हणून ओळखले जाते. आंबा सुरुवातीला पिवळा असतो. जसजसा पिकतो तसा तो लाल होतो. एका आंब्याचे वजन ९०० ग्रॅम ते एक किलो भरते.
अस्सल चव, अस्सल भावही... : आजपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव विचार करता हा अंबा अव्वल ठरला असून अडीच लाखे रुपये किलोप्रमाणे तो विकला जातो.या आंब्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात ही आर्थिक क्रांती ठरू शकते. पुसरा येथील सोळंके यांच्या शेतात सीताफळाचीही लागवड असून ही सीताफळे कोलकाता, हैदराबाद, पुणे, मुंबईच्या फळबाजारात शंभर रुपये किलोप्रमाणे विकली गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.