आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामे:बीड शहरात अनेक विकासकामे; शहरातील विकासकामांसह नागरी सुविधेसाठी कटिबद्ध

बीड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड शहरात अनेक विकासकामे झाली आहेत व काही भागात देखील विकास कामे सुरू आहेत. शहरात मागील काही काळात झपाट्याने लोकवस्त्या वाढत असल्याने शहरात हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ झालेल्या भागात देखील माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर व मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून विकास कामे करण्यासाठी निधी आणला आहे. त्यामुळे बीड शहरात दर्जेदार सिमेंट रस्ते, नाल्या पहावयास मिळत आहेत. रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक २२ मधील कै.भगवानराव भोसले नगर भागात दर्जेदार रस्ता तयार करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे लोकार्पण युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरात हद्दवाढ झालेल्या भागात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे सातत्याने बीड शहरातील विकास कामांसाठी शासन दरबारी जाऊन निधी उपलब्ध करत आहेत. बीड शहरातील अनेक भागात दर्जेदार रस्त्यांचे व नाल्यांचे कामे झाली आहेत काही ठिकाणी सुरू आहेत. शहरवासीयांना आगामी काळात जास्तीत जास्त विकासकामे करून नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न राहील व त्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती विनोद मुळुक, माजी नगरसेवक रवींद्र कदम, गणेश वाघमारे, रंजीत बनसोडे, बाळासाहेब घोडके, रवींद्र डावकर, शैलेश जाधव, गणेश जाधव, अतुल काळे, शारेक झकेरिया यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...