आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांविरोधात याचिका दाखल करणार विनायक मेटे, म्हणाले - 'मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा'

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द केले.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा अशी मागणी मेटे यांनी केली. 5 मे रोजी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यानंतर मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करुन जवळपास पंधरा दिवस झाले आहेत. मात्र आजतागायत सरकारने कोणतीही हालचाल केलेली नाही. सरकार मराठा समाजाविरोधात द्वेषाने वागत आहे असेही ते म्हणाले. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात येत्या मंगळवारी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना मेट म्हणाले की, याबरोबरच मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केलीय. त्यांना ताबडतोब नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी देखील मेटेंनी केली आहे. अन्यथा न्यायालयात सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा मेटेंनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द केले. यानंतर मराठा समाज आता ओपन कॅटेगिरीमध्ये गणला गेला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने जे 10 टक्के आर्थिक दुर्बल ओपन वर्गासाठी जे आरक्षण लागू केले आहे त्यामध्ये मराठा समजा चपखल बसत आहे. पण आम्ही वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि सरकारकडे करत आहोत की, आता मराठा समजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा. परंतु गेल्या 5 तारखेपासून आज 21 तारखेपर्यंत सरकारने काहीच हालचाल केलेली नसल्याचा आरोप मेटेंनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...