आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:बीडमध्ये विनायक मेटेंच्या नेतृत्वात निघाला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, वाहतुकीत बदल

रोहित देशपांडे, बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती संघर्ष मोर्चा दुपारी 1 वाजताच्या सुमारास निघाला. कोरोना आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने याचे योग्य नियोजन केले असा दावा करण्यात आला. दुपारी 1 च्या सुमारास शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून हा मोर्चा निघाला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने धडकला.

पोलिस सतर्क, तगडा बंदाेबस्त :
या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित आले. स्टेडिअमनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झालेला हा मोर्चा नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने गेला. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त लावला. ३ डीवायएसपी, पोलिस निरीक्षक, सपोनि, कर्मचारी, होमगार्ड, क्यूआरटी, एसआरपी, दंगल नियंत्रण पथक तैनात केले.

कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध यावरून खास खबरदारी घेतली जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या मराठा आंदोलकांना कुठलाही त्रास होणार नाही. मोर्चा शांततापूर्वक पद्धतीने पार पाडण्यात यावा. आंदोलकांनी पोलिसांना शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यात सहकार्य करावे. पोलिसांनी सुद्धा शांतता आंदोलनात सहकार्य आणि तयारी केली आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोर्चा सुरू झाल्यानंतर वाहतुकीत बदल
मोर्चा सुरू झाल्यानंतर माेर्चाच्या मार्गावर असणारी वाहतूक बंद होणार आहे. नगर रोड आणि जालना रोडवरून शहरात वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. नगर रोडवरून येणारी वाहने कॅनॉल रोडवरून जालना रोडकडे वळवली जातील तर, जालना रोडवरून येणारी वाहने बायपासहून शहराबाहेर काढली जातील. शिवाय, शहरातही मोर्चा सुरू असेपर्यंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता बंद असेल.

बातम्या आणखी आहेत...