आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा शिक्षक:औरंगाबाद विभाग मतदार संघाचा खरा‎ दावेदार मराठवाडा शिक्षक संघच : घाडगे‎

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा‎ खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच असून संघटनेने‎ उमेदवारी दिलेल्या सुर्यकांत विश्वासराव यांना निवडून‎ आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संघटनेचे‎ मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष पी.एस. घाडगे यांनी‎ केले. परळी येथील वैजेनाथराव भोसले सांस्कृतिक‎ सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय‎ कार्यकारिणीची विस्तारित बैठक १ जानेवारी रोजी पार‎ पडली. यावेळी घाडगे बोलत होते.

संघटनेचे‎ सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा‎ वरवट्टे, एस.जी. गुट्टे, सहसचिव टी.जी. पवार, एन.जी.‎ माळी, कोषाध्यक्ष ए.बी. औताडे यांच्यासह संघटनेचे‎ जी.एस. बुरांडे,यु.आर. थोंबाळ, प्राचार्य शंकर राठोड,‎ डी.जी.तांदळे, विश्वाभंर भोसले, बी.टी.सांगळे,‎ प्रा.उमाकांत राठोड, प्रा.चंद्रकांत चव्हाण, सुभाष‎ पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर होते.‎

बातम्या आणखी आहेत...