आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरडले:माजलगाव राष्ट्रीय महामार्गावरील मारफळा; ट्रॅव्हलचालकाने खेर्डावाडी येथे विद्यार्थ्याला चिरडले

गेवराईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खेर्डावाडी येथील १५ वर्षीय इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मारफळा येथे शाळेत येत असताना पुणे येथून नांदेड येथे जाणाऱ्या एका ट्रॅव्हलचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत विद्यार्थ्याला चिरडले असून तो जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गढी माजलगाव राष्ट्रीय महामार्गावरील मारफळा येथे घडली आहे. ओमकार भागवत कादे असे मृताचे नाव आहे.

गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे (१५) हा विद्यार्थी मारफळा येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी खेर्डावाडी येथून मारफळा येथे जात असताना पुणे येथून नांदेडला जाणाऱ्या ट्रॅव्हल (एम एच २३ डब्ल्यू ७६६६ ) या चालकाने भरधाव वाहन चालवून सदरील विद्यार्थ्याला चिरडले. यात तो विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. दरम्यान, मृत ओमकार कादे याचे जातेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात ट्रॅव्हलचालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. तलवाडा पोलिसांनी ट्रॅव्हलचालक आणि ट्रॅव्हल ताब्यात घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास तलवाडा पोलिस ठाण्याचे एपीआय प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भारत गायकवाड करत आहेत.

तीन विद्यार्थ्यांना उडवले हाेते अज्ञात ट्रॅव्हलने
गेवराई तालुक्यातील गढी माजलगाव या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर परभणी पुणे, नांदेड पुणे यासह अनेक ट्रॅव्हल जात येत असून मागील तीन वर्षांपूर्वी गढी जवळपास तळेवाडी येथील व्यायाम करण्यासाठी आलेल्या सुनील प्रकाश थोटे, जाधव आणि यमगर या तीन विद्यार्थ्यांना एका अज्ञात ट्रँव्हल ने उडवले असताना त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.