आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण ‎:सरपंच, उपसरपंचपदी वरपगावात‎ उपेक्षित समाजाला मिळाली संधी‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज‎ तालुक्यातील वरपगाव - कापरेवाडी‎ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे‎ अनुसूचित जमातीसाठी राखीव होते.‎ कोळी समाजाच्या नीता कांबळे या‎ सरपंच पदावर निवडून आल्या. तर‎ उपसरपंच पद हे पॅनल प्रमुख अॅड.‎ बाबुराव देशमुख यांनी स्वतःकडे न‎ घेता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून‎ या प्रवर्गातील पारधी समाजाचे‎ विलास पवार यांना संधी दिली आहे.‎ त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दोन्ही‎ पदावर उपेक्षित समाजाला न्याय देत‎ गावचे कारभारी करून समाजापुढे‎ आदर्श ठेवला आहे.‎ वरपगाव -कापरेवाडी येथील‎ ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे‎ अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी‎ राखीव होते. या निवडणुकीत‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग‎ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ अॅड. बाबुराव विष्णू देशमुख यांनी श्री‎ वेताळसाहेब महाराज बहुजन‎ ग्रामविकास पॅनल उभा करून सरपंच‎ पदासाठी कोळी समाजाच्या नीता‎ दादाराव कांबळे यांना उमेदवारी दिली होती.

या निवडणुकीत नीता कांबळे‎ या ५०९ मतांच्या फरकाने विजयी‎ झाल्या. तर पॅनल प्रमुख अॅड.‎ बाबुराव देशमुख यांच्यासह ९‎ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ‎ ‎ झाले.‎ दरम्यान, उपसरपंच पदावर पॅनल ‎प्रमुख अथवा दुसऱ्या प्रवर्गाच्या ‎सदस्याला संधी देण्याची परंपरा रूढ ‎झाली आहे. मात्र पॅनल प्रमुख अॅड. ‎बाबुराव देशमुख यांनी उपसरपंच पद‎ हे स्वतःकडे न घेता अनुसूचित‎ जमाती प्रवर्गातील पारधी समाजाचे ‎विलास सुबराव पवार यांना संधी‎ दिली आहे.‎ सरपंच हे अनुसूचित जमातीसाठी ‎ ‎ राखीव असताना उपसरपंच पदावर‎ ही त्याच प्रवर्गातील दुसऱ्या जातीच्या ‎उमेदवाराला संधी देऊन त्यांनी‎ मनाचा मोठेपणा दाखवून देत‎ समाजापुढे एक आदर्श निर्माण केला ‎आहे. त्यांच्या या आदर्श निर्णयाचे ‎गावकऱ्यांनी कौतुक करीत त्यांचा ‎सत्कार केला. दरम्यान, यामुळे एक ‎आदर्शही निर्माण झाला आहे.‎

प्रस्थापित गटाची सत्ता उलथवून ग्रामपंचायतीत परिवर्तन

वरपगाव - कापरेवाडी या ग्रामपंचायतीवर आता पर्यंत भाजपचे जेष्ठ नेते रमेश‎ आडसकर गटाचे वर्चस्व होते. अॅड. बाबुराव देशमुख यांनी या निवडणुकीत परिवर्तन‎ करीत ग्रामपंचायतीमधील प्रस्थापित गटाची सत्ता उलथून लावली.‎

दोन्ही दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी पद घेतले नाही‎

ग्रामपंचायतीच्या निवडणूक सर्वसामान्य, बहुजन, दीन- दलित वर्गाला सोबत घेऊन‎ लढविली होती. समानतेची वागणूक सर्व प्रवर्गाला मिळाली पाहिजे. यासाठी कोळी व‎ पारधी या दोन्ही दुर्लक्षित घटकांना सरपंच व उपसरपंच या पदावर समान संधी मिळावी.‎ म्हणून उपसरपंच पद हे स्वतः न घेता पारधी समाजाला दिले आहे.‎ -अॅड. बाबुराव देशमुख,पॅनल प्रमुख, वरपगाव.‎ वरपगावमधील सरपंच, उपसरपंचांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...