आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पैशासाठी छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

केज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस? या कारणावरून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळास कंटाळून एका २६ वर्षीय विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ढाकेफळ (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पती, दिरास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. ढाकेफळ (ता. केज) येथील मृत शिल्पा योगिराज घाडगे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी योगिराज भिवाजी घाडगेसोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली, एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली होती.

बातम्या आणखी आहेत...