आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलवली झेंडू शेती:कान्होबावाडीचा ‘मार्तंड’ हैदराबादच्या बाजारात विक्रीला

जालिंदर नन्नवरे| शिरुरकासार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याची दुष्काळ भूमी म्हणून असलेली ओळख मागील काही वर्षापासून शेतकरी पुसत आहेत. आधुनिक शेतीची कास धरत वेगवेगळ्या उत्पादनातून कुटुंबाला उन्नतीकडे घेऊन जात आहेत शिरूर तालुक्यातील कान्होबाचीवाडी येथील युवक पारंपारिक शेतीला तडा देऊन आधुनिकतेच्या जोरावर थेट हैदराबाद येथील फुल बाजारात नाव गाजवत आहे.

आजिनाथ विठ्ठल जाधव यांना वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. पूर्वी या शेतीमध्ये कापूस, बाजरी,तूर ही पीक पारंपरिक पद्धतीने घेतले जायची परंतु मागील काही वर्षापासून आजिनाथ जाधव यांनी प्रगत शेतीचा मार्ग अवलंबला फुल व फळबाग शेतीला प्राधान्य दिले आज त्यांनी मार्तंड नावाच्या झेंडूच्या फुलाची दोन एकरवर शेती फुलवली आहे. हे मार्तंड सध्या थेट हैदराबादच्या फुल बाजारामध्ये विक्रीसाठी जात असून त्यांना तेथे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे दर प्राप्त होत आहे. फुलाची मागणी वाढत असून हे दर देखील वाढणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. दोन एकर क्षेत्रामध्ये किमान दहा लक्ष रुपयाचे उत्पादन अजिनाथ जाधव यांना अपेक्षित आहे.

आजिनाथ जाधव यांचे वडील विठ्ठल जाधव यांनी मुलाला पारंपारिक शेती पद्धतीत काहीच हातात उरत नाही. यामुळे वेगळं काहीतरी करावे लागेल याचे बळ मुलगा आजिनाथ जाधव यांच्या पाठीशी उभा करून आधुनिक झेंडू मिरची व इतर शेतीत त्यांना सातत्याने वडील विठ्ठल जाधव हे मदत करीत आहेत.

वाहतुकीला स्वतःचे वाहन असल्याने सुविधा झाली
मागील पाच वर्षापासून आजिनाथ जाधव हे फुल शेती करीत आहेत. वाहतुकीसाठी मोठा खर्च येत असल्याने त्यांनी स्वतः पिकअप घेतले असून त्यांना पिकवलेला माल बाजारपेठात नेण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो व नफा अधिक मिळताे.

फुलबाजारात मागणी कमी
मुंबई पुणे कल्याण या ठिकाणच्या फुल बाजारामध्ये फुलाची मागणी सध्या कमी असल्यामुळे येथील बाजारपेठात फुले कमी भावाने विकली जात आहेत. यामुळे हैदराबाद येथील फुल बाजारामध्ये मार्तंड नावाच्या झेंडूच्या फुलाला अधिक मागणी आहे व भावही चांगला मिळत असल्याने झेंडू हैदराबादच्या बाजारपेठात नेला जात आहे. असे आजिनाथ जाधव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...