आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापनदिन:मसापचा 79 वा वर्धापनदिन बीड येथे साजरा होणार; ठाले-पाटील यांची माहिती

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेचा ७९ वा वर्धापनदिन या वर्षी मसाप बीड शाखेच्यावतीने बीड येथे साजरा होत असून या सोहळ्याचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता साहित्यिक व माजी कुलगुरू प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने मराठवाड्यातील सर्व ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील मान्यवर कवींचे बहारदार कविसंमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने मसापच्या बीड शाखेची बैठक झाली.

शाखेचे कार्यवाह प्राचार्य जे. एम. पैठणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले गत ७९ वर्षात बीडला प्रथमच मसापच्या वर्धापनदिन संपन्न होतोय ही अत्यंत आनंदाची बाब आहे शाखा अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी कार्यक्रमाची रूपरेखा विशद केली. ते म्हणाले, जिल्ह्यातील मान्यवर व नवोदित कवींना निमंत्रण देण्यात आली असून त्यांचे बहारदार कवी संमेलन संपन्न होणार आहे ही रसिकांना पर्वणी म्हटली पाहिजे. या बैठकीत विविध समित्यांची निवड करण्यात आली. या बैठकीला दीपक सरवदे, मंगेश रोटे, श्रीराम गिरी, प्रशांत मुळे व जगन्नाथ कांबळे यांनी आपली मते मांडली. बैठकीत श्रीराम गिरी आणि जगन्नाथ कांबळे यांना कवी संमेलनाचे निमंत्रण कार्यवाह प्राचार्य पैठणे यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी दीपक सरोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे कार्यवाह प्रा. डॉ. दादा गोरे हे वर्धापनदिन सोहळ्याचे मार्गदर्शन करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...