आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मटका बुकीवर छापा, 76 जणांवर गुन्हा, 7 जण ताब्यात; मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शाहूनगर भागातील सम्राट चौकात सुरू असलेल्या मटका बुकी व जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. या वेळी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी ७६ जणांवर गुन्हा नोंद केला.

शहरातील शाहूनगर भागातील सम्राट चौकात एक मटका बुकी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरून मंगळवारी छापा मारुन पोलिसांनी ज्ञानेश्वर आसाराम निंबाळकर (रा. शनिमंदिर गल्ली, बीड), भूषण दहिवाळ (रा. पोस्टमन कॉलनी), शरद सुभाष शिंदे (रा. शाहूनगर, बीड), भारत बाबासाहेब जाधव (रा. माळीगल्ली, बीड), प्रदीप किशोर वाघमारे (रा. चक्रधर नगर, बीड), हनुमान क्षीरसागर (रा. धानोरा रोड, बीड) अशोक गव्हाणे (रा. बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही बुकी विशाल जाधव (रा. पांगरी रोड), उमेश उर्फ विकी शिवशंकर महाजन (रा. क्रांतीनगर, बीड) यांची असल्याचे सांगितले. शिवाय, सोशल मीडियाद्वारे ६७ एजंटांकडून मटका घेत असल्याचे सांगितल्यावरून एकूण ७६ जणांवर गुन्हा नोंद केला.

बातम्या आणखी आहेत...