आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:युसूफ वडगाव येथे  मटका घेणारा अटकेत

केज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युसूफवडगाव पोलिसांनी गावातील हनुमान मंदिराच्या बाजूला बसून मटका नावाचा जुगार खेळवीत असलेल्या एकास अटक केली. त्याच्याकडून नगदी रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. युसूफवडगाव येथील ज्योति राम कैलास सावंत हा गावातील हनुमान मंदिराच्या बाजूला कल्याण मटका नावाचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून खेळत व खेळवीत असताना ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहि फळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर रोजी छापा टाकून पकडले.

त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व रोख १ हजार १८० रुपये जप्त केले. पोलीस नाईक शाम राव खनपटे यांच्या फिर्यादीवरून ज्योति राम सावंत याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...