आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून पाच महिन्यांत दीड हजार रुग्णांना मदत:मविआनेे कक्ष केला होता बंद; शिंदे सरकारने दिले 10 कोटी

अमोल मुळे | बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर तत्पूर्वी भाजप सरकारच्या काळात सुरू असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष बंद करण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मागील पाच महिन्यांच्या काळात या कक्षाने दीड हजार रुग्णांना तब्बल १० कोटींची मदत केली आहे.

भाजप-सेना युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत व्हावी या हेतूने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना केली होती. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे या कक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी असताना लाखो रुग्णांना कोट्यवधींची मदत पाच वर्षांच्या काळात केली गेली होती. दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा कक्ष बंद करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात राजकीय स्थित्यंतरे होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंंत्रिपदी, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राज्यात जुलै महिन्यांत नवे सरकार उदयाला आले. यानंतर पुन्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवेचे काम करणारे मंगेश चिवटे यांची या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली गेली होती. दरम्यान, जुलै महिन्यांपासून राज्यातील रुग्णांना पुन्हा एकदा उपचारांसाठी मदत देण्याची कारवाई सुरू झाली असून जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांच्या काळात १ हजार ५८९ रुग्णांना जवळपास १० कोटी ९० लाख ३३ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कक्षाच्या वतीने देण्यात आली.

राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आधार मदतीचा चढता आलेख महिना रुग्ण मदत जुलै १९४ ८३ लाख ५७ हजार ५०० ऑगस्ट २७६ १ कोटी ४० लाख ५५ हजार ३०० सप्टेंबर ३३६ १ कोटी ९३ लाख ९० हजार २५० ऑक्टोबर २५६ २ कोटी २१ लाख ८० हजार नोव्हंेंबर ५२७ ४ कोटी ५० लाख ८२ हजार एकूण १,५८९ १० कोटी ९० लाख ३३ हजार

संकेतस्थळ सुरू, नव्या आजारांचा समावेश दरम्यान, आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेही करता येणार असून यासाठी mahacmmrf.com gs हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे, तर फुप्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया आणि खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया यासह इतर अनेक नव्या आजारांचा यात समावेश केला करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...