आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:गेवराई तालुक्यातील दोन मुन्नाभाई डॉक्टरवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची कारवाई

गेवराई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • डिग्री नसतानाही अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय चालवत होते

गेवराई तालुक्यातील पाचेगाव याठिकाणी गेल्या काही दिवसापासून दोन बोगस डॉक्टर दवाखाने चालवित असल्याची माहिती मिळाल्याने शनिवारी गेवराईचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने त्याविरुद्ध कारवाई केली. याठिकाणी धाड टाकून या दोन मुन्नाभाई डॉक्टरावर कारवाई केल्याने बोगस डॉक्टरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.         गेवराई तालुक्यातील पाचेगाव हे जवळपास 10 हजार लोकसंख्येचे गाव आहे. तसेच या गावाअंतर्गत छोठी-मोठी गावे देखील असल्याने हि तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमीच गर्दी असते. दरम्यान याठिकाणी डॉ. विजय राठोड व डॉ.श्रीमंत बाबुलाल मेहता हे दोघे गेल्या काही महिन्यापासून विनापरवाना त्यांच्याकडे डिग्री नसतानाही अवैधपणे आपला वैद्यकीय व्यवसाय चालवत आहेत. याची माहिती गेवराईचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर.कदम यांना मिळाल्यानंतर त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे, डॉ. नजमोद्दीन नोमानी, डॉ. धनंजय माने आदींसह शनिवारी पाचेगाव याठिकाणी जाऊन या दोघांच्या दवाखान्याची झाडाझडती घेतली. तेव्हा दोघेही डॉक्टर बोगस असल्याचे त्यांना आढळून आले असून घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच दोन्ही दवाखान्याच्या मधोमध एक मेडिकल होते, सदरील दवाखाना चालवित असलेली जागा देखील त्याच्याच नावे असल्याने या मेडीकल मालकाला सह आरोपी करण्यात आला आहे. या प्रकरणी निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ धनंजय माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी डॉ. विजय राठोड, डॉ.श्रीमंत बाबुलाल मेहता सह आरोपी बबन पिसे यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यामध्ये मेडिकल प्रोटेक्शन अॅक्ट 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही डाँक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईने बोगस डॉक्टरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अशा डॉक्टरांन जागा देणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार 

तालुक्यात असे बोगस डॉक्टर असतील तर नागरिकांनी देखील माहिती द्यावी, निश्चितच कारवाई करण्यात येईल. तसेच अशा बोगस डाँक्टरांना गावात जागा उपलब्ध करुन देवू नये, तसे आढळून आल्यास जागा देणाऱ्याविरोधात देखील कारवाई करण्यात येईल. - डॉ. एस.आर.कदम (तालुका वैद्यकीय अधिकारी, गेवराई)  

बातम्या आणखी आहेत...