आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे:‘मी हिंदुस्थानी’ या दीर्घांकाचा 4 ऑगस्टला केएसकेमध्ये प्रयोग

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभाग आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहमदनगर येथील पसायदान अकादमी निर्मित ‘मी हिंदुस्थानी’ या दीर्घांकाचा नाट्य प्रयोग ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी दिली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अहमदनगर येथील पसायदान अकादमीचे पी.डी.कुलकर्णी यांनी १५ ऑगस्टपर्यंत ३५ दिवसात ७५ प्रयोगाचा संकल्प विनामुल्य केला आहे. त्याअनुषंगाने ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सौ.के.एस.के.महाविद्यालयाच्या सभागृहात ‘मी हिंदुस्थानी’ या दीर्घांकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्कार, संस्कृती, प्रखर राष्ट्रवाद, परंपरा, आध्यात्मिक, वैचारिक बैठक यांच्या पाठबळावर हिंदुस्थान सर्व घटकांना समर्थपणे तोंड देत आहे. ही सर्व वैशिष्ट्ये तरूणांपुढे नेण्यासाठी हा प्रयोग सादर केला जात आहे. ‘मी हिंदुस्थानी’ या नाटकाचे लेखन तेजस परसपाटकी व पी.डी.कुलकर्णी यांनी केले आहे तर प्रवीण कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेल्या एक तासाच्या दीर्घांकांत स्वतः प्रवीण कुलकर्णी व सारिका पटवर्धन यांनी भूमिका केल्या आहेत.

कल्पना नवले, पवन नाईक, श्रेयस शित्रे, शैलेश देशमुख, सुलभा कुलकर्णी आदींनी तांत्रिक बाबी सांभाळल्या आहेत. या नाट्य प्रयोगासाठी रसिकांनी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीश माऊलगे, डॉ.दुष्यंता रामटेके,विजय राख आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...