आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोळकानडी येथे चोरीच्या घटनेनंतर घेतली बैठक, गावपातळीवर रात्र गस्त करावी : मोरे

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोळकानडी येथे वाढत्या चोऱ्या पाहता अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे यांनी सर्व गावकऱ्यांना एकत्रित करून घरफोडी, चोरी, जबरी चोरी दरोडा यासारख्या घटना घडू नयेत यासाठी काय करायला पाहिजे या संबंधाने संवाद साधला. या वेळी गावकरी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, गावामध्ये जर कोणी नवीन मनुष्य आला तर त्याचा फोटो, आधार कार्ड, ज्या वाहनातून आलेला असेल त्या वाहनाचा नंबर इत्यादी माहिती गावकऱ्यांनी जमा करून ठेवली पाहिजे. जेणेकरून संशयित इसम गावात येऊन गेल्यावर दोन तीन दिवसांनी जर एखादी गुन्हेगारीची घटना घडली तर त्या माहितीच्या आधारे संबंधित इसमांकडे चौकशी करता येईल. त्याचप्रमाणे आपली माहिती गावकऱ्यांकडे गेली आहे या भीतीने त्या गावात चोरी करण्यापासून काही प्रमाणात का होईना पण परावृत्त होतील.

त्याचप्रमाणे गावांमध्ये प्रवेश करण्याच्या दोन्ही मार्गावर, गावातील मुख्य चौकात सीसीटीव्ही लावून घ्यावेत.सुगीचे दिवस संपत आल्याने लोकांकडे धान्य व पैसा जमा होत आहे. त्यामुळे चोऱ्या होण्याची शक्यता जास्त आहे. नजीकच्या काळात ते चोरी करण्याचा नक्की प्रयत्न करतील तो हाणून पाडण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन सतर्कतेने, रात्र गस्त करावी पोलीसांच्या प्रयत्नात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी केले.

पोलिसही करणार मदत
गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी चार-पाच लोकांचा ग्रुप करून सतर्क गस्त करावी, याकरिता पोलिससुद्धा मदतीला देण्यात येतील, जेणेकरून गावांमध्ये भविष्यात कधीही चोरी होणार नाही, असे मोरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...