आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठका‎:पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर एमआयएमच्या‎ गेवराई, माजलगाव, धारूर तालुक्यांमध्ये बैठका‎

बीड‎3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‎एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक यांनी गेवराई, माजलगाव आणि‎ धारूर तालुक्यात झंझावाती दौरा केला. यावेळी ‎स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे अन्य‎ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित‎ होते.‎ दौऱ्यादरम्यान घेतलेल्या छोटेखानी सभांमध्ये ‎गेवराई येथे बोलताना शफिक भाऊ म्हणाले की,‎ पवार आणि पंडित या डबल पी-पी मुळे गेवराई ‎तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ‎ होत चालली आहे.

ज्यामुळे त्यांच्या जवळील‎ बगलबच्च्यांना सोडले तर इतर सर्वसामान्य‎ जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या‎ पी-पी कडून जनतेला मुक्त करण्यासाठी‎ एआयएमआयएम कडून सक्षम पर्याय देणे आपले‎ कर्तव्य आहे.‎ माजलगाव तालुक्यात फक्त स्वतःचे वजन‎ वाढवून तालुक्याचे वजन हलके करणाऱ्या‎ सोळंके यांची एकाधिकारशाही संपुष्टात‎ आणायची आहे. धारूर तालुक्यात भाजपचे‎ डॉक्टर हजारी यांच्या मनमानीला ही आळा‎ घालायचा आहे. याकरिता पक्षाच्या सर्व‎ पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक कार्यकर्त्यांनी झोकून‎ देऊन कामाला लागावे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक‎ नगर परिषदेमध्ये आपल्या पक्षाला घवघवीत यश‎ मिळवायचे आहे.

याकरिता जिल्हा पातळीवरील‎ नेतृत्वासह प्रत्येक तालुक्यातील नेतृत्वाने‎ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह झोकून देऊन‎ कामाला लागावे. प्रत्येकाने आपापली भूमिका व‎ कार्य योग्य आणि चांगल्या पद्धतीने करावे असे‎ म्हटले. सर्व ठिकाणच्या बैठकीमध्ये पादधिकारी,‎ कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...