आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात विविध यशस्वीतेबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम होते. सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, शेख सानिया जाकेर, लक्ष्मण चव्हाण व त्यांचा संघ हे होते. आयक्यूएसी समन्वयक मुकुंदराज पाटील, प्राचार्य डॉ. शेख शकीला यांची प्रमुख उपस्थिती हाेती. शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ वसंत सातपुते यांना यावर्षीचा ‘महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार दरवर्षी भारतीय प्रशासकाला त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो. सातत्याने विविध शैक्षणिक प्रयोग करून परिसरातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल महात्मा गांधी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी मुंबई यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे, तसेच शेख सानिया जाकीर हिने अल्पसंख्याक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये अतिशय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल व बँड वादन स्पर्धेमध्ये लक्ष्मण चव्हाण व विद्यार्थ्यांचा संच जिल्हास्तरावर विजेता ठरल्याने या सर्वांचा आज सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती बोबडे, प्रास्ताविक एम.डी. मेहत्रे तर आभार सुरेश मोरे यांनी केले, या प्रसंगी प्रा. सतिश वाघमारे, प्रा. दिलीप कोरडे, प्रा. रवि धोंडगे, प्रा. संतोष वडकर, प्रा. कैलास आरबाड, प्रा. मंगल गव्हाणे, प्रा. शिल्पा भोसले, प्रा. निता रसाळ, आदींसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.