आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्थान:जगाला पसायदानातून शांततेचा संदेश; माउलींचे आजोबा गोविंदपंतांच्या दिंडीचे 30 जूनला होणार प्रस्थान

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाला पसायदानातून शांततेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा गोविंदपंत संस्थानची पंढरपूर दिंडीची तयारी सुरू झाली असून यंदाचे पालखी सोहळ्याचे हे तेरावे वर्ष आहे. येत्या ३० जून रोजी ही दिंडी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे संत ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा गोविंदपंत यांची दिंडी दोन वर्षात पंढरपूरला जाऊ शकली नव्हती. दोन वर्षे रथ जागेवरच असल्याने नादुरुस्त झाला होता. मंडळाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेतली असता त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. येत्या ३० जूनला बीड येथील समाधी स्थळापासून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. यंदाच्या दिंडीत ५०० पेक्षा अधिक वारकरी सहभागी होणार असून दिंडीचा मार्ग ठरवण्यात आला आहे.

या वर्षी हा दिंडी सोहळा यशस्वितेसाठी संस्थानचे अध्यक्ष रामदास जाधव, प्रा. संतोष महाराज तौर, सचिव राधाकृष्ण वाव्हळ, दिंडी प्रमुख सुग्रीव डाके महाराज, चोपदार अर्जुनराव शिंदे हे विशेष परिश्रम घेत आहेत. ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी आपली नावे नोंदवावी तसेच ज्यांना आर्थिक स्वरूपात सहकार्य करावयाचे आहे, त्यांनी सुग्रीव महाराज डाके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...